
अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी दिला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-येथील गोर गरीब गरजू लोकांना मशीनमध्ये लिंक नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानाचे दररोज चकरा माराव्या लागत आहे. परंतु याकडे शासन यांचेकडे का दुर्लक्ष करीत आहे. असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे.
या महागाईचा भस्मासूर काळात हातावर आणणे आणि पाणावर खाणे असे सुरू आहे.दररोज मोल मजुरी करण्यारया गरीब जनतेला आपली मजुरी सोळून रेशन दुकानात जाऊन परत या लागते कारण आजही काही लोकांची परिस्थिती तिच आहे. रेशन आणंने आणि खाऊन आपला गुजारा करणे परंतु हा डिसेंबर महिला सुरू होऊन आज जवळपास 12 , 13 दिवस लोटूनही अजुन पर्यंत लिंक आली नाही आहे असा स्वस्त धान्य दुकानदार उत्तर देतो असा कधी पर्यंत चालेल जर लिंक येत नसेल तर जुन्या पद्धतीने रेशन कार्डवर खतवणी करून जनतेला धान्य वाटप करण्यात यावे. अन्यथा शासनाचे समोर आंदोलन सुरू करण्यात येइल असा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केला आहे.