
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: G20 प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे काल (मंगलवार) सायंकाळी आयोजन करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचेसह जी-20 प्रतिनिधी उपस्थित होते.
G20 परिषदेला कालपासून (मंगळवार) मुंबईत प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राचा संपन्न वारसा, संस्कृती, परंपरा आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख G20 परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींना व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गेट वे ऑफ इंडिया जवळील हॉटेल ताज पॅलेस येथे या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गेट वे ऑफ इंडियाला करण्यात आलेला विशेष लाईट शो, गीत-संगीताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी, पुणेरी ढोल पथकासह फेटे बांधून केलेल्या मराठमोळ्या स्वागताने जगभरातील प्रतिनिधी मंत्रमुग्ध झाले.