
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-काल हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बदनामी करू नका अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा असूनही सत्ताधारी पक्षाचे १४ लोकप्रतिनिधी बोलतात मात्र विरोधी पक्षाच्या एकच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही हा विरोधी पक्षावर एक प्रकारे अन्याय आहे.
सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना देखील विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब केले जाते. या सरकारच्या कामकाजा विरोधात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आवाज उठवला त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. पंरतु केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेबांवर निलंबनाची कारवाई केली.
या हुकुमशाही सरकारच्या विरोधात दी. 23 .12 .2022 ला चिमूर येथील तहसील समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असुन यावेडेस जिल्हा उपाध्यक्ष. श्रीनिवास शेरखी . चिमूर तालुका अध्यक्ष. राजु भाऊ मुरकुटे चिमूर तालुका युवक अध्यक्ष. मनीष वजरे जिल्हा सचीव रमेश भाऊ खेरे
किशोर भाऊ गभणे भिसी शहर अध्यक्ष, अनिल भाऊ रामटेके चिमूर शहर अध्यक्ष स्वरूर तळवेकर . तालुका उपाध्यक्ष राहुल हिंगे तालुका सचीव मेहबूबभाई शेख अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष
दिनेश शंभरकर विनोद नागदेवते मिलिंद काळे कृष्णाजी बहाद्दूरे हंसराज रामटेके। नरेश डड्मल अरविंद भुजाडे बंडू मेश्राम गणेश चौधरी पदाधिकारी व इतर कार्यकर्त सहभागी होते.