
म.रा.मराठी पत्रकार संघ शाखा चिमुर व परीवारातर्फे केले सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमुर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील दौलतसिंग एफ.जुनी वय २० वर्ष तरून देशाच्या शेवेसाठी आज.दि.२८/१२/२०२२ ला कमांडो च्या ट्रेनिंगला बैंगलोर ला रवाना होत असून एक महिण्या पुर्वी अग्निविर आर्मी भर्ती घेण्यात आली होती या भरतीत सर्व स्थरावर प्रथम क्रमांक घेत जिल्हात एकमेव पॅरा कमांडो साठी पात्र ठरला.
जांभुळघाट येथे दि.२७/१२/२२ ला निवास्थानी जाऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा चिमुर चे केवलसिंग जुनी (अध्यक्ष),विलास मोहीनकर (संघटक),कृष्णकुमार टोंगे (सरचिटणीस),उपक्षम रामटेके (सहसंघटक),सुनिल हिंगणकर (सदस्य) व परीवार यांचे तर्फे पुष्प गुच्छ व शिल देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढच्या वाढचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्यात सर्व स्थरावर कौतुक केले जात आहे.