
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी:-आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते भिसी येथील श्री स्वामी नारायण बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा व
सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा उध्दाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विधिवत पूजन व दीपप्रज्वलन केल्यानंतर फीत कापून फलकाचे अनावरण करत उद्घाटन सोहळा पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना गौरविण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान, महाविद्यालयाच्या वतीने आमदार कीर्तिकुमार यांच्या आगमना प्रसंगी पुष्पहार घालून स्वागत केले आणि शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी नारायण बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष पंकज मिश्रा, श्री स्वामी नारायण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव गणेश गभने यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्रामुख्याने पोलीस निरीक्षक चिमूर गभने सर, पोलीस निरीक्षक भिसी राऊत सर, पोलीस उपनिरीक्षक भिसी जंगम सर, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, राजेन्द्र जाधव, मनोहर कामडी, गुणवंत अगडे, मनोज गोलजवार, सौरभ दंदे, महेश राखडे, युवराज मुरस्कर, नितीन कायरकर, अरूण गोहने, श्रीकांत गिरडे, हरीभाऊ वैद्य,भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभने, लीलाधर बन्सोड, विनोद खेडकर, राजू बानकर, आकाश ढबाले, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, गोलू भरडकर, बंटी वनकर, अमित जुमडे, भूषण सातपुते, पंकज मोलोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.