
मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन,चिमूर च्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील ‘दर्पण’ हे पहिले वर्तमानपत्र सुरु करुन मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांचा कणखर बाणा आजच्या पत्रकारितेतूनही दिसतो. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला,
या निमित्ताने चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर चे अध्यक्ष पंकज मिश्रा,सचीव युवराज मुरस्कर, उपाध्यक्ष सुनील कोसे, सहसचिव योगेश सहारे, कोषाध्यक्ष प्रमोद राऊत,संजय नागदेवते दै. महासागर, जगदीश पेंदाम नवभारत, सुशांत इंदूरकर सकाळ, राजेंद्र जाधव सकाळ, सुनील हिंगणकर, रोशन जुमडे, पंकज रणदिवे नवजीवन, आशिष गजभिये नवजीवन, विलास कोरम देशोन्नती, विनोद शर्मा साप्ताहिक, बाळू चांदेकर उपस्थित होते.