
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी:-श्री स्वामी नारायण बहुउद्येशीय संस्था, गडचिरोली व्दारा संचालित श्री साई क्लासेस अकॅडमी व शॉवलिन पब्लीक अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतिक स्नेहसम्मेलन आयोजित करण्यात आले होते. दिनांक 3 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यान आयोजित या कार्यक्रमामध्ये पहील्या दिवशी श्री स्वामी नारायन बहुउद्येशिय संस्था व्दारा संचालीत नवीन,
श्री साई सायंस व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज चे उद्घाटन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी क्रिडा स्पर्धा व प्रज्ञाशोध परीक्षेचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शेवट च्या दिवशी 5 जानेवारी ला क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतिक स्नेहसम्मेलनाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक समुद्रपुर पंचायत समीतीचे शिक्षण विस्तार अधीकारी ललीत बार साकडे, प्रमुख पाहुने पवनी आरोग्य केन्द्राचे वैद्यकिय अधीकारी डॉ. आशीश मोहरकर, मालिनी धवनकर मॅडम नागपूर, गजानन माडवे सर, श्री स्वामी नारायण संस्थेचे उपाध्यक्ष पंकज मिश्रा,सचीव गणेश गभणे, चिमुर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमुर चे सदस्य राजेन्द्र जाधव प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होता. कार्यक्रमाचे संचालन विद्या माडवे मॅडम व आभार जिवतोडे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश कोथळे, अक्षय सातपैसे, निखील कोथळे व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.