Breaking News

दिल्ली च्या उत्कृष्ट सरकारी शिक्षण क्रांती चे पडसाद नवी मुंबईत

दिल्लीतील उत्कृष्ट सरकारी शिक्षण क्रांती च्या जनक, अतीशी सिंग नवी मुंबईत

गुजरात विधानसभा निवडणुकीत १४% मतांसह ५ जागांची विजयश्री मिळवून देणारे आप गुजरातचे माजी अध्यक्ष नवी मुंबईत

नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र – कोकण विभागाचा भव्य कार्यकर्ता मेळावा -‘आप’ला मेळावा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नवी मुंबई: रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी, वाशी डेपोसमोरील, विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सकाळी ९:३० पासून, दुपारी २ वाजेपर्यंत आप महाराष्ट्र – कोकण विभागा तर्फे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी क्षेत्रातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकत्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. ह्या मेळाव्यात वरील सर्वच क्षेत्रातील सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

ह्या मेळाव्याचे आयोजक कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी व महानगर पलिकांचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष, यजमान आप नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्याम कदम व ह्यांची टीम असल्याने, नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांमधे विशेष उत्साह होता. पाहुण्यांचे स्वागत, खास मराठी तुतारीने करण्यात आले. या मेळाव्यातुन आप राष्ट्रीय कार्यकारणी, तसेच महाराष्ट्र कार्यकारणीचे सदस्य यांनी, आज सर्व सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या विविध जनताभिमुख विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यात, सरकारी शिक्षण आणी स्वास्थ व्यवस्था, माहिती अधिकार, सामाजिक न्याय, सरकारी निमसरकारी उद्योगाच्या खाजगीकरणाचा चालू झालेला अतिरेक, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, महिला सुरक्षा, नागरी सुरक्षा, कामगार – कष्टकरी व शेतकरी यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, प्रस्थापितांचा भ्रष्ट राज्य कारभार अशा विविध विषयांवर आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या, दिल्ली विधानसभा आमदार व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या शिक्षण प्रणालीचे सल्लागार म्हणून काम करून दिल्लीमधील सरकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अतीशी सिंग, यांनी उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्था कशी असावी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दिल्ली आमदार मा. कुलदीप कुमार ह्यांनी नुकत्याच दिल्ली मनपा मधील विजयाची यशोगाथा वर्णन केली. त्याच प्रमाणे सुरत मनपा निवडणुकीत मध्ध्ये आपला २७ जागांची विजयश्री मिळवून देणारे, गुजरात विधानसभा निवडणुकीत १४% मतांसह ५ जागांची विजयश्री मिळवून देणारे आप गुजरातचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र सहप्रभारी तरुण आणि तडफदार नेते गोपाळ इटालिया ह्यांनी गुजरात विजयाची यशोगाथा ऐकवली.

उत्कृष्ट वक्ते, ग्रामीण नेतृत्व आणी आप महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे ह्यांनी देखील, आपल्या खुसखुशीत शेय्लीतील भाषणात कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत, सन्घटनेचे महत्व समजवून सांगितले.

याशिवाय या मेळाव्याला आप महाराष्ट्र कार्यकारिणीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला, महादेव नाईक – महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई अध्यक्ष श्रीमती प्रीती मेनन, किशोर मांध्यान – उपाध्यक्ष-महाराष्ट्र, धनराज वंजारी – उपाध्यक्ष – महाराष्ट्र, हरिभाऊ राठोड – उपाध्यक्ष-महाराष्ट्र, विजय कुंभार संघटन मंत्री,धनंजय. शिंदे – सचिव-महाराष्ट्र, डॉ. फैजी – राज्य समिती सदस्य, कुसुमाकर कौशिक – प्रदेश समिती सदस्य, रूबेन मस्करेन्हास, द्विजेंद्र तिवारी, प्रदेश समिती सदस्य, डॉ. संतोष करमरकर – समन्वयक आरोग्य विभाग व कोकण विभागाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved