
नेरी येथे कूंग फु कराटे स्पर्धा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जनता विद्यालय नेरी च्या पटांगणात ‘अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी’ च्या वतीने संस्था अध्यक्ष शिफु डॉ सुशांत इंदोरकर यांच्या मार्गदर्शनात ‘ नॅशनल लेवल कुंग फु कराटे ओपन चॅम्पियनशीप २०२२’ चे आयोजन केले होते. या चॅम्पियनशीप मध्ये चंद्रपूर वणी मूल चिमूर तसेच इतर भागातून जवळपास १३५ स्पर्धकांनी भाग घेऊन आपल्या युद्ध कौशल्याचे प्रदर्शन केले.
प्रेरणा कॉन्व्हेंट चिमूर येथे पंधरा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले कला प्रदर्शन करीत पदकांवर वर्चस्व गाजवला. काता प्रकारात पाच सुवर्ण, पाच रजत,पाच कास्य पदकांची लूट करीत कॉन्व्हेंट बेस्ट चषकाची मानकरी ठरली. यामध्ये कु.तेजल बोरकर,समृद्धी भरडे,युवाक्षी बोरकुटे,आदर्श खाडे,सुयोग गायकवाड यांनी सुवर्ण पदक कु.अक्षरा बन्सोड , कु.प्रणाली टेकाम, कु.इशिका भलमे , अंश रामटेके , स्नेहल येरमे रजत पदक तर कु .आशु मेहरकुरे,कु.माही गजभिये , कु .नव्या सावसाकडे , प्रयास इन्दुरकर , प्रनिक वाघमारे यांनी काश्य पदक पटकावले .आयोजकांनी चषक देऊन कॉन्व्हेंट ला सन्मानित केले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. आशिष पाटील चिमूर तथा नेरीच्या सरपंचा रेखाताई पिसे यांचेसह इतर मान्यवरांनी केली. नितेश उघडे सर भिसी,आरती पडाल, करिश्मा सोनकुसरे, मोहिनी समर्थ आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा संचालन मा. विशाल इंदोरकर व मा. पिपलायन आष्ट्णकर यांनी केले. रेफरी व्यवस्थापन मा. सुदर्शन बावणे तर बाऊट व्यवस्थापन मा.रेशम पिसे, मा.आदित्य फुलझेले, राहुल गहूकर, मयूर कुंदोजवार यांनी पाहिले. इतर व्यवस्था विशाल बारस्कर यांनी पाहिली.