
ट्रॅक्टर सहित ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर वरोरा रोडवरील लोखंडी पुलाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला असून चिमूर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक्टर सहित ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे, प्रशांत भास्कर नन्नावरे राहणार नेरी हा इसम स्वतःच्या मोटर सायकल क्रमांक एम एच 34 CC 9205 ही गाडी चालवत असताना त्याच्या मागे देविदास शत्रुघ्न वाघमारे वय 35 राहणार पांढरवानी हा व्यक्ती मागे गाडीवर बसून असताना खडसांगी कडून चिमूर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॅक्टरचे समोरील मुंडके मोटारसायकल लागले.
त्यामुळे गाडीवर मागे बसून असलेले देविदास वाघमारे राहणार पांढरवानी गाडीच्या खाली पडले व त्यांचे पायावरून ट्रॅक्टर गेले, देविदास वाघमारे याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं असता रुग्णाचा मृत्यू झाला, फिर्यादी प्रशांत भास्कर नन्नावरे यांच्या तक्रारी नुसार पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ट्रॅक्टर सहित ताब्यात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल केला, पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात नायब पोलीस शिपाई प्रमोद पडाल सहायक फौजदार केशव गेडाम करीत आहे,