
चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज चिमूर तालुका काँग्रेस च्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा क्र. २ अंतर्गत सन २०१२ ला राजेंद्र बकाराम देव्हारे रा नवतळा अनिल आत्माराम पाटील, अस्मिता अनिल पाटील रा गडपिपरी यांना बॅंक ऑफ इंडिया नेरी व कोकण विदर्भ ग्रामीण बॅंक भिसी यांच्या कडून कर्ज देण्यात आले कर्जाची मुद्दल रक्कम लाभार्थ्यांना १० वर्षात परतफेड करणे होती आणि त्यावरील व्याज शासनाला लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे होते लाभार्थ्यांनी मुद्दल परतफेड केली परंतु शासनाने व्याजाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली नाही बॅंकांनी खातेदारांना अनेक नोटीस पाठवून व्याजाची रक्कम भरण्यात यावी नाही तर कारवाई करण्यात येईल,
चिमूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात व्याजाची रक्कम लवकरात लवकर शासनाने जमा करावी अशी मागणी केली आहे निवेदन देताना विजय डाबरे सचिव चिमूर तालुका कॉंग्रेस कमिटी, अविनाश अगडे अध्यक्ष शहर कॉंग्रेस कमिटी चिमूर, नागेंद्र चट्टे उपाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा, राजेश चौधरी उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी चिमूर, ओम खैरे उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी चिमूर विलास मोहिनकर सचिव शहर कॉंग्रेस कमिटी चिमूर उपस्थित होते व सोबत लाभार्थ्यी उपस्थित होते.