
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बीड: परळी वैजनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन तिन महीन्या पुर्वी माॅ साहेब चौक ते दोस्ती टी हाऊस पर्यंत नवीन पाईप लाईन टाकाव्यात अशी मागनी करुन ती पुर्ण करुन घेतली, परंतु काल परवा तीच पाईपलाईन काही ठिकाणी लीकेज होत असल्याची तक्रार त्या भागातील काही नागरीकांनी मनसेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबधीत पाणीपुरवठा अधिकार्यांना फोनवरून सांगीतले व दुरूस्ती तात्काळ करण्यासंबधी विनंती केल्यानंतर त्यांनी उडवा उडवी चे उत्तर देताच, वैजनाथ कळसकर यांनी खळफट्याक आंदोलनाचा ईशारा देताच 24 तासाच्या आत दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्यानंतर त्या भागातील नागरीकांनी मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांचे आभार मानले.