Breaking News

चिमूर येथे महाराष्ट्र पोलीस निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमाबाबत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चिमूर येथील पुरुषोत्तमदास बागला कॉन्व्हेन्ट येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त “महाराष्ट्र पोलीस. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ जानेवारी रोजी संपन झाले, यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमांचे पालन यावर मार्गदर्शन केले, चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत २ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी जनजागृती केली होती, व दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी पुरुषोत्तमदास बांगला कॉन्व्हेन्ट चिमूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच इयता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चिमूर येथे भेटी करीता आमंत्रित करून पोलीस स्टेशनचे कामकाज, CCTNS प्रणाली, शस्त्रे व दारूगोळा इत्यादींची सविस्तर माहिती देण्यात आली होती,
त्यानंतर पुरुषोत्तमदास बांगला कॉन्व्हेन्ट चिमूर येथे “महाराष्ट्र पोलीस’ या विषयावर निबंध तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,

या स्पर्धेत एकूण १६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेतील विजेत्याना पोलीस निरीक्षक मनोज गभने पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते. पोलीस नाईक कैलास आलम, महिला पोलिस अमलदार महानंदा आंधले, यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, सदर बक्षीस वितरणाला पुरुषोत्तमदास बांगला कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका मिरा पेंडके, उपमुख्यध्यापिका सुनीता जोशी, व सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

रस्ते अपघात टाळण्यासाठी वडकी पोलीस स्टेशन येथे हेल्मेट लकी ड्रॉ

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * कायद्याचे धाकाने नको तर स्वतः ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved