
महालगाव (काळु) येथील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-तालुक्यातील महालगाव (काळु) येथील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र शेतकर्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली.शासणाने वाढीव नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले.आज पर्यत वाढीव मदत मिळालीच नाही.त्यामुळे वाढीव मदत २६ जानेवारी पुर्वी द्यावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार असल्याचा इशारा उप विभागीय अधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनाद्वारे महालगाव (काळु ) येथील शेतकऱ्यानी केली आहे.
पावसाळ्यातील आगष्ठ महिन्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.ज्यामुळे शेतपिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शासणाने अतिवृष्टी नुकसानी बद्दल प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत जाहीर केली.चिमूर तालुक्यातील महालगाव (काळु) येथील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी न करता अत्यल्प मदत देण्यात आली.याविषयी शेतकर्यांनी तक्रार करूण आंदोलन करण्याची भुमिका घेतली होती.प्रत्यक्ष पंचणामा करूण वाढीव मदत देण्यात यावी याकरीता ३ नोव्हेंबर २०२२ ला महालगाव (काळु ) वासीयांनी शासनाकडे निवेदने सादर केले.त्यावर शासणा कडून ७०% वाढीव मदत देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
आजतागायत अतिवृष्टीग्रस्ताना वाढीव मदत मिळालीच नाही.त्यामुळे शासणाच्या सुस्त प्रशासणास जागे करण्या करीता १३ जानेवारी शुक्रवारला उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वी वाढीव मदत देण्याची मागणी करण्यात आली.अन्यथा प्रजासत्ताक दिनाला ग्राम पंचायत महालगाव (काळु) येथील फडकलेल्या राष्ट्रध्वजा समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.महालगाव (काळु ) येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्या मार्फत सदर निवेदन देवाजी लोखंडे,बंडू बोरकर,प्रविण खवसे,अमित नगराडे,विजय गेडाम,गजानण मसराम यांनी दिले.