Breaking News

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजने अंतर्गत 50 हजाराचे अनुदान दया

शेतकऱ्यांच्या हितासाठी युवासेनेचे तहसीलदार वरोरा यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या हस्ते वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्या संदर्भात रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले.सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 ला राबविण्यात आली.

या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करनाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 हजारांचे अनुदान देणे बंधनकारक होते.
मात्र युनियन बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेतील 33 शेतकरी अजूनही लाभपासून वंचित आहे.पात्र शेतकरी बँकेत वारंवार जाऊन मॅनेजरला विचारणा करीत आहेत मात्र त्यांना तारीख वर तारीख देण्यात येत आहे.तरी 33 शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अन्यथा शेतकरी विरोधी बँक म्हणून बँकेला ताळे ठोकून युवासेना तर्फे आंदोलन करण्यात येईल अशे व्यक्तव युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांनी निवेद्वाना द्वारे कळविले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved