
पांदण रस्त्यावरच शेतकरी बसले उपोषणाला
काग ते नंदरा पाणंद रस्त्यासाठी शेतकरी बसले साखळी उपोषणाला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-पळसगाव(पिपर्डा)चिमूर तालुक्यातील काग येथील शेतकरी यांच्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप दोन ये अडीच वर्षापासून निकाली निघाला नसल्याने,आज प्रहर जण शक्ती पक्षच्या वतीने काग ते नंदरा या पांदण रस्त्यांवरील शेतकरी यांनी पांदण रस्तावर उपोषण मडप टाकून साखळी उपोषणाला आज पासून सुरवात केली आहे.
दोन किलोमीटरच्या रस्त्यांसाठी गावाला वडसा मारून बम्हणी या गावरून नऊ किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.या मुळे उलट जास्त अंतर पार करावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना त्यांनी वेक्त केल्या आहेत.
शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागते. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करता-करता, शेतकरी थकूनही जातो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही अपेक्षापूर्ती होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते.
पावसाळ्यात पाऊस आला की, पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने, चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशा बिकट परिस्थितीत शेतमाल घरी कसा आणावा, या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडते.
या पूर्वी २०२२ मध्ये पालकमंत्री पाणंद रस्त्यांचे काम मंजूर होते मात्र खनिकर्म निधी नसल्याचे कारण समोर करून सदर पांदण रस्त्याचे काम करण्यात आले नाही,तेव्हा सदर रस्ताचे काम हे खनिकर्म योजने मधून निधी उपलद्ध करून मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीच तरतूद करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.
नंदरा ते काग या पांदण रस्त्याचे काम हे खनिकर्म मंडळातुन करण्यात यावे या करिता सदर रस्त्यावरील शेतकरी यांनी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जण शक्ती पार्टीच्या वतीने प्रहरसेवक आशिद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणला सुरवात करण्यात आली आहे.या वेळी कार्तिक मेश्राम,सोमेशवर डाहुले, सुरेश परचाके,अरविंद नैताम आणि त्या पांदण रस्तावरील २० शेतकरी उपोषण स्थळी उपस्थित होते.