Breaking News

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 17 : चंद्रपूर जिल्ह्यातील, वरोरा तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी रास्तभाव दुकानातून मोफत धान्य दिले जाणार आहे. वरोरा तालुक्यातील 10 हजार 62 अंत्योदय शिधापत्रिका व 90 हजार 196 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पुढील 1 वर्षाकरीता याचा लाभ होणार आहे.

 

अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड 5 किलो गहू व 30 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या कार्डावरील प्रति व्यक्तींना प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. तसेच अंत्योदय कार्ड धारकांना प्रतिकार्ड 1 किलो साखर 20 रु. या दरात उपलब्ध राहील.

तसेच ज्या लाभार्थ्यांनी माहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2022 चे धान्य उचलले नाही, असे लाभार्थी दि. 1 जानेवारी, 2023 नंतर माहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर, 2022 चे धान्य उचल करीत असतील तरी ते धान्य मोफत दिले जाणार आहे. याबाबत वरोरा तालुक्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांनी नोंद घ्यावी व संबंधित रास्तभाव दुकानातून नियमित धान्याची मोफत उचल करावी, असे वरोराच्या तहसीलदार रोशन मकवाने यांनी कळविले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved