
चिमूर येथून होणार प्रकाशित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर क्रांती नगरीतून नव्यानेच पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करणारे “साप्ताहिक लोक प्रतिष्ठा” या वृत्तपत्राचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२३ रोजी रविवारला आदर्श विद्यालय बी पी एड कॉलेज ग्राउंड चिमूर सकाळी ११:३० वाजतां संपंन होत आहे,
या कार्यक्रमा करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर नागदेवते कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांचे हस्ते संपणं होणार आहे,
कार्यक्रमाकरीता चिमूर तालुका प्रेस असोशीयशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, साप्ताहिक पुरोगामी संदेश वृत्तपत्राचे संपादक सुरेश डांगे, शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, व्हॉईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार राजू रामटेके, आदर्श विद्यालयचे मुख्याध्यापक नैताम सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, साप्ताहिक लोकप्रतिष्ठा वृत्तपत्राच्या लोकार्पण सोहळा करीता वाचकांनी जास्तीत जास्त संख्येने उस्थित राहावे असे आवाहन साप्ताहिक लोकप्रतिष्ठाचे संपादक रामकुमार चीचंपाले यांनी केले आहे