
रविवारला भव्य शोभायात्रा
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने शनिवार दि. २१ व उद्या रविवार दि. २२ जानेवारीला संताजी विचार मंच चावडी मोहल्ला, चिमूर येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली, आज शनिवार दि. २१ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता ग्रामसफाई झाल्यानंतर श्री संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन दिवाकर नागोसे, हरिचंद्र हिंगणकर, प्रा. महादेवराव पिसे, परसराम खाटीक यांचे उपस्थित संपन्न झाले. दुपारी १२ वाजता महिलांचा हळदी-कुंकु कार्यक्रम यावेळी संपन्न झाले,
रविवार दि.२ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेसह शोभायात्रा झाल्यानंतर, दुपारी १२ वाजता ह. भ. प. जीवन महाराज आळंदीकर यांचे गोपालकाल्याचे किर्तन होईल. दुपारी ४ वाजता महोत्सवा दरम्यान झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरणाकरीता महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा किर्ती कातोरे, जिल्हाध्यक्षा श्रुती घाटे, जिल्हाध्यक्षा भावना बावणकर यांची विशेष उपस्थिती राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस स्टेशन चिमुरचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे, विभागीय अध्यक्ष अजय वैरागडे, सामाजिक कार्यकर्ता धनराज मुंगले, सहाय्यक निबंधक राजु अगडे आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व गुणवंत विध्यार्थी व विशेष व्यक्तींचा सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त तैलिक समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.