Breaking News

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 21 : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे 52 विद्यार्थी खराळपेठ येथे सहलीला गेले होते. जेवण करून सायंकाळी घरी आल्यानंतर 12 मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे भरती करण्यात आले. भरती असलेल्या सर्वांची तब्येत बरी आहे. तर इतर मुले आपापल्या घरी व्यवस्थित असले तरी त्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved