Breaking News

सोशल मिडियाचा वापर करुन सायबर गुन्हेगार फसवितात – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – जगभरात व्हॉटस अॅप या अॅप्लीकेशनचा बहुतांश नागरीक दैनंदिन वापर करीत असतात. याचाच सायबर गुन्हेगार एका वेगळ्या पध्दतीने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार बेरोजगारी, टाळेबंदी, आणि लोकांच्या अतिरिक्त उत्पन्नचा फायदा घेत आहे, जसे की ५० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक केल्याबद्दल मिळवा. हे सायबर गुन्हेगार व्हॉटस अॅप, लिंक्डइन, अगदी फेसबुक सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन पिडीतांना सहज पैसे देण्याचे आमिष दाखवतात आणि असे देखील भासवतात की दर दिवशी ५००० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक करुन तुम्ही मिळवू शकतात. या सर्व गोष्टींसाठी ते तुमची खाजगी माहिती देखील विचारतात आणि काही वेळेस ते तुम्हाला काही डिपॉझीट रक्कम देखील भरण्यास सांगतात.

म्हणून तरुण मंडळींनी अशा फसव्या मॅसेजला बळी पडू नये व असे कोणतेही नोकरी नसते जी तुम्हाला घरी बसल्या एका लाईकने प्रतिदिन ५००० हजार रुपये मिळवून देवू शकते म्हणून अशा कोणत्याही मॅसेजला प्रतिसाद देवू नका, आपली खाजगी माहिती कुणालाही शेअर करु का व अश कोणत्याही फसव्या लिंकवर करु नका, असे आवाहन सायबर तज्ञ आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved