
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 23 : पोलिस स्टेशन, पडोली येथे अजय विजय आवळे रा. येरुर, ता. चंद्रपूर यांच्या तोंडी रिपोर्टवरुन त्याची आई संगिता विजय आवळे वय 39 वर्ष रा. येरुर, या दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कोणालाही काही न सांगता हातात पिशवी घेवुन घरून निघून गेली आहे. तिच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता शोध लागला नाही.
हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे:
सदर महिलेचे वय 39 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फूट, मजबुत-बांधा, चेहरा गोल, अंगात गुलाबी रंगाची साडी, उजव्या हातावर संगिता विजय आवळे असे गोदविलेले आहे. सदर वर्णनाची महिला परिसरात आढळून आल्यास सदर हरवलेल्या महिलेची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन, पडोली च्या वतीने करण्यात आले आहे.