
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:- स्वराजनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा व शिवसेना तालुका कार्यालय भद्रावती येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दीप प्रज्वलन करुन,पुष्पहार घालुन विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यावेळी बाळासाहेब अमर रहे, जय भवानी जय शिवाजी अश्या घोषणा देण्यात आल्या.
तसेच भद्रावती शहरात शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती नंदु पढाल यांच्या नेतृत्वात वैशाली दाते,अमृता पारशीवे या खेळाडूंना पालकांच्या उपस्थिती मध्ये शाल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अभियांत्रिकी स्टुडन्ट प्राजक्ता जनावार हिने कॉटन पॉलिश क्लीनर शोध लावल्यामुळे पालकांच्या उपस्थिती मध्ये शाल शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गजानन महाराज मतिमंद विद्यालय भद्रावती येथे जाऊन मतिमंद विद्यार्थीना व शिक्षकांना भोजनदान दिले.
असा सामाजिक उपक्रम राबऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती पार पाडली.
त्यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवसेना शहर प्रमुख भद्रावती घनश्यामआस्वले,शिवसेना शहर प्रमुख वरोरा संदीप मेश्राम, युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, युवासेना जिल्हा चिटणीस येशु आरगी, शिवसेना माजी नगरसेविका सुषमाभोयर, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, युवासेना तालुका प्रमुख भद्रावती राहुल मालेकर, युवासेना तालुका सनमव्यक सतिश आत्राम,युवासेना तालुका सनमव्यक निहाल धोटे,शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे, शिवसेना उपजिल्हा सनमव्यक कीर्ती पांडे,
शिवसेना शहर संघटिका भद्रावती मायाताई टेकाम,शिवसेना उपशहर संघटिका वरोरा अल्का पचारे,युवती उपजिल्हा प्रमुख शिव गुडमल, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवासेना शहर प्रमुख गौरव नागपुरे, युवासेना शहर प्रमुख गणेश जानवे,मोहन बावणे,अनिलगाडगे,संजू, खोडे अतुल नांदे,किशोर जिवतोडे,रोशन, वंदना डाखरे,पवन एकरे,वैद्य पाटील,शुभम टोरे,मेघश्याम शेंडे,विनय पागरूत,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होत्या.