
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे – नागरीकांना अमुक तमुक बँकेकडून केवायसी अपडेट केले नाही या संदर्भात मॅसेज येतात, ते लगेच करा अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल असे सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ते पुढे जसे जसे सूचना करत जातात त्या सूचना नागरीक पाळत जातात, त्यात तुमचा अकाउंट नंबरपासून तर आधार कार्ड नंबर पर्यंत सगळ्या गोष्टी विचारुन घेतल्या जातात आणि मग सांगतात की आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला कळवा मग तुमचे प्रोसेस पुर्ण होवून तुमचे केवायसी अपडेट होईल. तुम्ही त्याप्रमाणे ओटीपी आल्यावर तो ओटीपी तुम्ही लगेच त्या अज्ञात व्यक्तीला देतात अन् क्षणार्धात तुमचे बँक अकाउंट खाली होते.
मुळात कोणतीही बँक असे केवायसी ऑनलाईन अपडेट करायला सांगत नाही, केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्या बँकेत जावे लागते हे नागरीकांनी कायम लक्षात ठेवावे आणि हे जर लक्षात ठेवले तर आपली होणारी फसवणूक टाळता येईल. तसेच असे फसवणुकीचे फॉड मॅसेजेस नीट बारकाईने वाच जा हमखास तिथे एखादी काहीतरी गडबड सहज कळू शकते.
सायबर फ्रॉडच्या आजवर इतक्या केसेस पाहिल्या त्या सर्वांमध्ये एक कॉमन धागा आहे तो म्हणजे ‘बेसावध क्षण’. मग तो हॅकर्सकडून आलेला कॉल असेल किंवा आलेला मॅसेज असेल. हमखास आपल्यापैकी अनेक जण त्या क्षणी हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात आणि अन घोळ होतो आणि मग नंतर जेव्हा कळत तेव्हा खूप उशिर झालेला असतो. म्हणून अशा फसव्या मॅसेजपासून नागरीकांनी सावध रहावे व अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याअगोदर नागरीकांनी विचार करावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व सायबर अॅवरनेस फाउंडेशनचे सदस्य श्री. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.