Breaking News

७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांनी या निमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

राज्यातील युती सरकारने गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या भाषणातून त्यांनी मांडला. यात प्रामुख्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नव्याने कार्यान्वित झालेले मेट्रो मार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तयार होत असलेली मिसिंग लिंक, कोकण ग्रीनफिल्ड हायवे, कोस्टल रोड या सगळ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रगती त्यांनी मांडली. राज्याने स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची केलेली निर्मिती, ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेत १ ट्रीलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी दाओस येथे करण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे करार हे या दृष्टीने टाकलेलं सकारात्मक पाऊल असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

कृषी,उद्योग,आरोग्य, जलयुक्त शिवार, २६३ सौर निर्मिती प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी दिलेली सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला फायदा याबाबत त्यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला.

यासमयी भारतीय नौदल, पोलीस दल, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा दल, दंगलविरोधी पथक, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, मुंबई पोलिसांचे निर्भया पथक, गडचिरोली सी-६० कमांडो पथक, सुरक्षारक्षक मंडळ यांनी यावेळी झालेल्या संचलनात सहभाग घेतला. त्यासोबतच राज्य प्रशासनातील शालेय शिक्षण क्रीडा विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, सामजिक न्याय सामान्य प्रशासन, वन विभाग, कामगार विभाग, ऊर्जा विभाग, नगरविकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध विषयावरील आकर्षक चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते.

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राज्य प्रशासनातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved