Breaking News

क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांना मारहान, चौघावर गुन्हा दाखल

नेरी येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/नेरी:- नेरी येथे दिनांक 27/01/2023 रोजी दुपारी 03/00 वाजताच्या सुमारास यशवंत निकोडे व नंदु मोरेश्वर निकोडे दोघे भाऊ मिळुन CD Delux या मोटार सायकलने जनता विद्यालय नेरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यास गेले. विद्यालयाच्या ग्राऊंडवर मोटार सायकल पार्किंग करुन कार्यक्रम पाहत असतांना काही वेळाने चुलत भाऊ नंदु निकोडे हा पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला.

तेव्हा यशवंत सोबत त्याचा मित्र सागर भशासकर रा. शिरपुर हा हजर होता. यशवंतने कार्यक्रम पाहता पाहता मागे फिरून पाहीले तेव्हा एक माणुस त्यांनी पार्किंग करुन ठेवलेल्या टू व्हिलर गाडीचा मागचा इंडीकेटर हालवतांना दिसल्यामुळे यशवंत लगेच गाडीजवळ आला.तो इंडीकेटर तोडु नये म्हणुन यशवंतने त्याचा हात धरुन बाजुला करण्याचा प्रयत्न केला परंतु तो दारु पिऊन असल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर खाली पडला. तेवढ्यात त्याचे तिन ते चार सोबती यशवंत जवळ येऊन अश्लील शिविगाळी करत अंगावर धावत येऊन जमिनीवर पाडुन हाताबुक्क्याने व लाथाने वाटेल तसे मारायला लागले.

मारहाण करतांना जिवी मारण्याची धमकी देत होते. तेवढ्यात यशवंतचा भाऊ नंदू निकोडे सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास आला तेव्हा त्यांनी त्याच्या भावाला सुध्दा हाताबुक्क्यांनी मारपीट केली. काही वेळाने लोकांची गर्दी झाल्याने ते तिथुन पळून गेले. मारपिटीमधे यशवंतच्या उजव्या खांदयावर, पाठीवर, उजव्या अंगठयाला, कमरेचे खाली मार लागला. तसेच भाऊ नंदु याला उजव्या हाताचे कोहणीजवळ, पाठीवर, मानेवर मार लागला.

काही वेळाने कार्यक्रमामध्ये हजर असलेल्या लोकांकडुन मारहाण करणाऱ्यांचे नाव मंदार ढोणे,कैलास नन्नावरे,सुरज ढोणे, राहुल ढोणे सर्व रा. नेरी असल्याचे माहित पडले. मारहाणीत जखमी झालेले दोन्ही भावंड उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे गेले असता सायंकाळी एक्स रे न झाल्याने दुसऱ्या दिवशी एक्स रे करून चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मी शेवगांवकर चा दणका मोडला नगरपरिषदेत खोटा ले आउट सादर करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar मुंबई चे उद्योगपती विमान कंपनीचे मालक विठठल भास्कर भारदे …

पोलीसांची धडक कारवाई आरोपीला २४ तासात केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी * * दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved