Breaking News

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंचा शोध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 29 : जिल्हा वार्षिक योजना 2023 नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची शोध मोहीम क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

‘इंडिया खेलो फुटबॉल’ या नाविन्यपूर्ण योजनेतून 2 लाख 50 हजार इतक्या निधीतून व 15 आणि 17 वर्षातील मुलांकरिता ट्रायल्स आयोजित करण्यात आले आहे. या ट्रायल्स मधून जे विद्यार्थी आपल्या कौशल्य दाखवतील त्यांची दिल्ली येथे पुन्हा व्यावसायिक क्लब मार्फत निवड चाचणी घेण्यात येऊन त्यांची निवड त्या त्या क्लब मध्ये होणार आहे.

या विशेष मोहिमेकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि इंडिया खेलो फुटबॉल या संघटनेचे हितेश जोशी यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved