
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघसाहेब यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात,
शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर दादाजी दहिकर व युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिषभाऊ जेठानी यांच्या सहकार्याने, *मातोश्री* येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांतभाऊ कोल्हे, सहसभापती पुंडलिकभाऊ चौखे,मनसे शहर प्रमुख चिमूर नितीनभाऊ लोणारे, उपशहर प्रमुख संजयभाऊ वाकडे, विभाग प्रमुख मंगेशभाऊ ठोंबरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित मनसे पदाधिकारीनी उद्धवसाहेब यांचे आभार मानले.
तसेच शिवसेना पक्षाचे काम जोमाने करणार अशे आश्वासन नवनियुक्त शिवसैनिकांनी उद्धवसाहेबांना दिले.तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या नवनियुक्त शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यावेळी समस्त पदाधिकारी,नवनियुक्त शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.