Breaking News

अवैध रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 03 : तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करताना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठाविण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.

या लिलावामध्ये ट्रॅक्टर, हाफटन,जेसीबी, हाफबॉडी ट्रक, तीनचाकी ऑटो, ट्रक आदी वाहनांचा समावेश आहे, असे चंद्रपूरचे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved