
गोपाल काल्याला लावली उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान गोपाळ काल्याचे निमित्ताने माजी विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले,पंचक्रोशित प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या वर्षी सुधा घोडा रथ यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू असून रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, दिनांक 6 फेब्रुवारी रोजी गोपाळ काल्याचे निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते, माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी श्रीहरी बालाजी देवस्थान येथे भेट देत बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले व सर्व भाविकांच्या सुख समाधानासाठी प्रार्थना केली.
यावेळी श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निलम राचलवार, धर्मसिंग वर्मा, श्रीहरी बालाजी भक्त मंडळचे नैनेश पटेल, रक्षक हरणे, अमेय नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, दिपक निकुरे, भिमराव ठावरी, राजेश लोणारे, राजू दांडेकर, सुधीर पंदीलवार, कमलेश बांबोले व सर्व पदाधीकारी उपस्थित होते.