
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:- नेरी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी महामुनी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा व माता रमाई जयंती नेरी येथे उत्साहात संपन्न झाली, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला,
नेरी येथील महामुनी बुद्ध विहार कृती समिती शांती वॉर्ड नेरी तथा धम्म उपासकाच्या संयुक्त विदयमाने विहाराचे “लोकार्पण सोहळा व माता रमाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घघाटन चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभने, यांचे हस्ते करण्यात आले, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, पोलीस नाईक कैलास आलम, भंते धम्म सांरई, भारतीय बौद्ध महासभा राज्यअध्यक्ष दिनेश हनुमंते, समता दुत प्रज्ञा राजूरवाडे, प्रमुख अतिथी म्हणून मंचकावर उपस्थित होते, सकाळी १० वाजता बुद्ध पाली पूजा भंते धम्म सारथी यांचे हस्ते करण्यात आले, दुपारी १२:३० वाजता पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विहार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामुनी बुद्ध विहार कृती सेवा समिती अध्यक्ष छबिला टेंभूरणे, विलास राऊत, सुशांत इंदूरकर, वीणा राऊत, माला सहारे, हर्षा ढवले, शालिनी साखरे, सीमा इंदोरकर, नंदिनी राऊत, अमर अंबादे, सुरेंद्र ढवले, अनिकेत ढवले, नितीन राऊत, विशाखा कऱ्हाडे, विशाल इंदूरकर यांनी अथक परिश्रम घेतले.