Breaking News

शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुका प्रमुख वरोरा पदी महेश देवतळे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघ व शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या सुचनेनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात, ग्रामपंचायत सदस्य माढळी महेश देवतळे यांची शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुका प्रमुख माढळी – नागरी जिल्हा परिषद क्षेत्र या पदावर नियुक्ती करण्यात आली.
महेश देवतळे हे माढळी ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य या पदावर कार्यरत आहे.

तसेच यांनी युवासेना च्या माध्यमातुन माढळी- नागरी क्षेत्रात जनतेच्या हितासाठी जनसेवा केली.त्यावेळी महेश देवतळे यांची नियुक्ती करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरजी मिलमिले, शिवसेना तालुका प्रमुख विपीन काकडे,जेष्ठ शिवसैनिक दडमल गुरुजी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसेना पदाधिकारी यांनी नवनियुक्त उपतालुका प्रमुख महेश देवतळे यांचे पुष्पगुछ देऊन हार्दिक अभिनंदन करून पुढच्या राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ताडोबा पर्यटण कोलारा कोर गेट सुरु

अभिनेत्री सधा सयद यांची उपस्थिती – पहिल्याच दिवशी उतम प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-पावसाळातील तिन …

29 सप्टेंबर रोजीच्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन अपॉइंटमेंट वेळेत बदल

3 ते 6 ऑक्टोबर कालावधीत होईल कामकाज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:शासनाने दि. 29 सप्टेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved