
प्रतिनिधी नागपूर
मौदा:-शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे शिव साप्ताहिक शिवजयंती 2023 महोत्सव दिनांक 13 फरवरी 2023 ते 19 फरवरी 2023 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे, या साप्ताहिक महोत्सव निमित्त दिनांक 13 फरवरी 2023 रोजी वार सोमवारला शिव साप्ताहिक सोहळ्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने, आणि आनंदामध्ये तालुका मौदा येथील भव्य दिव्य पटांगणामध्ये पार पाडण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य, आणि जपलेली संस्कृती घराघरात पोहविण्याचे कार्य शिवबा राजे फाउंडेशनी हाती घेतले. त्यासोबतच गाव तिथे वाचनालय मोहीम या मोहिमेला शिवबा राजे फाउंडेशनी सर्वात मोठे योगदान देण्याचे काम सुरू केले, आतापर्यंत शिवबा राजे फाउंडेशनच्या माध्यमातून 15 गावांमध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले.
यामागचा मुख्य उद्देश आणि हेतू म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याकरिता आणि वाचनाची आवढ निर्माण व्हावी, गरजू विद्यर्थ्यांना पुस्तके सहज उपब्धथ व्हावे, गावापासून शहरी भागांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना येणं शक्य नसल्यामुळे, आपण गाव तिथे वाचनालय ही मोहीम शिवबा राजे फाउंडेशन यशस्वीरीत्या चालवीत आहे. या साप्ताहिक शिवजयंती महोत्सव अंतर्गत आपण प्रत्येक दिवशी नवीन नवीन उपक्रम या साप्ताहिक शिवजयंतीमध्ये घेण्यात येणार आहोत, तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्व तहसील जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये शिवबाराजे फाउंडेशन सोबत जोडून सामाजिक क्षेत्रामध्ये आपले योगदान द्यावे, या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून,
ॲड. रणजीत सारडे उच्च न्यायालय नागपूर, आनंद मांजरखेडे सर रिप्रेझेंटेटिव्ह जिल्हा विधी प्राधिकरण नागपूर, तहसीलदार मलिक बियाणी सर वरिष्ठ पोलीस अधिकारी मौदा पोलीस स्टेशन खराबे सर फाउंडेशनचे संस्थापक रतनलाल ठाकरे, अध्यक्ष चेतन वानखेडे, मंगेश ठाकरे, राहुल टाले, सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा ठाकरे मॅडम यांनी केले, सर्व फाउंडेशनचे सदस्य आणि प्रामुख्याने सर्व तालुक्यातील महिला व पुरुष युवक युवती वर्ग उपस्थित होते.