Breaking News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिक्षाभूमीला भेट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

प्रतिनिधी नागपूर 

नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री.शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

शहा आणि  फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे,प्रा.आगलावे, विलास गजघाटे,भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved