
टायगर गृप भिसी तर्फे आयोजित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी : -महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जानता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्य भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
टायगर गृप भिसी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्य दरवर्षी नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर आधारित देखावे ( झांकी ) सादर केल्या जाते.परंपरा कायम ठेवत यावर्षी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बिपी, शुगर, जनरल तपासणी व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.रविवार सकाळी शिबिराचे उद्घाटन भिसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राऊत यांचे हस्ते भिसी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी, टायगर गृप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्याभाऊ अडबाले,प्रदीप कामडी, पंकज मिश्रा, पंकज गाडीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शिबिर महादेव मंदीर , जुनी ग्रामपंचायत चौक येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील.
सायंकाळी याच ठिकाणी रायगड किल्यावरील देखावा, लेझीम नृत्य, लाठी- काठी, पोवाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे तसेच इतर कार्यक्रमाचा लाभ भिसी वासीयांनी तसेच परीसरातील जनतेने घ्यावा असे आव्हाण टायगर गृप भिसी च्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती पंकज मिश्रा यांनी ज्वाला समाचार प्रतिनिधीशी बोलताना दिली.