
प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुका कार्यकारणी व टुगेदर विथ फाईट फाऊंडेशन चा संयुक्त विद्यमानाने दृग धामना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून शिव जयंती उत्साहात साजरी करत महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर ग्रामीण जिल्हा सचिव अतुल शेंडे, टुगेदर विथ फाईट फाऊंडेशन चे अध्यक्ष राजकुमार वानखेडे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मधुरी खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सखोल माहिती आपल्या भाषणातून यावेळी मान्यवरांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन बोरकर यांनी मानले. तसेच या प्रसंगी सोनु बोरकर, रोहित राऊत, वामन वाहने, छत्रपती शेंद्रे, प्रकाश मेश्राम, विनोद चाफेकर , संदीप सुखदेवे, दिपक कोरे, स्वप्नील चारभे शरद ढोके, अर्जुन बोरकर, बंटी बोरकर, मधुकर गजभिये, नरेंद्र नितनवरे, नितेश रंगारी , मालती मेश्राम, लोखंडे काकू तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.