
200 रुग्णांनी घेतला आरोग्य व नेत्र तपासणी चा लाभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी : – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शीबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १५० व्यक्तींची बिपी, शुगर व जनरल तपासणी व ५० व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आले.
टायगर गृप भिसी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्य दरवर्षी नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जाते. तसेच छ. शिवाजी महाराजांच्या जिवणावर आधारीत देखावे ( झांकी ) सादर केल्या जाते.परंपरा कायम ठेवत यावर्षी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राउत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समीती चिमूर चे माजी सदस्य प्रदीप कामडी, चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चे अध्यक्ष पंकज मिश्रा, छ. शाहु महाराज बहुउद्येशिय मंडळ भिसी चे अध्यक्ष पंकज गाडीवार, GMC चंद्रपूर चे डॉ.मिना व त्यांची टिम उपस्थित होते.
शिबीरात २०० व्यक्तींचे बिपी, शुगर, जनरल व नेत्र तपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले व ४० नेत्र बाधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालयात रेफर करण्यात येणार आहे अशी माहीती वैद्यकीय अधीकाऱ्यांनी ज्वाला समाचार प्रतिनिधी ला दिली. शिबिर यशस्वी करण्याकरीता टायगर गृप चे सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.