Breaking News

24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 22 : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे तर पशु – पक्षी प्रदर्शनी चांदा क्लब ग्राऊंडच्या समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पाच दिवस चालणा-या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि व संलग्न विभागाच्या योजना व उपक्रमांची माहिती मिळावी याकरीता कृषी विद्यापिठाचे तंत्रज्ञान, नामांकीत व खाजगी कंपन्याची उत्पादने, कृषी व पशु प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विषयक परीसंवाद तसेच चर्चासत्र, अनुभवी पुरस्कार प्राप्त शेतकरी, उद्योजकांचे मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय शेती बचत गट व महीला बचत गटांमार्फत उत्पादित केलेला शेतमालांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तर जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनीमध्ये राज्यातून गायवर्गात देवणी, खिल्लार, लाल कंधारी, डांगी, गवळावू तसेच गीर, साहिवाल, थारपारकर, कांक्रेज, रेड सिंधीच्या देशी गाई / वळू तसेच विदेशी जातीच्या संकरीत एच.एफ व जर्सीचे गाई/ वळू, म्हैसवर्गात नागपूरी, पंढरपुरी, मु-र्हा जातीच्या म्हशी / रेडा, शेळीगटात तोतापारी, बिटल, जमुनापारी, उस्मानाबादी व बेरारी जातीच्या शेळ्या / बोकड, मेंढीगटात दख्खणी मेंढ्या / मेंढा, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षीगटात कडकनाथ, कावेरी, सातपुडा, असील जातीच्या कुक्कुटपक्षी व खाकी कॅम्पबेल बदक व इतर पक्षी राहणार आहेत.

कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनात विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी व पशुसवंर्धन तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच विविध कृषी व पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जि.प. पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved