
भर दुपारी आठ लाखाची चोरी
पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे (राळेगांव)
राळेगाव:-शहरात दिवसा गणिक चोऱ्यांचे प्रमाणात वाढ होत असून रात्री घरी नसल्याचे पाहून हमखास चोरीचे प्रकार वाढले आहे रस्त्यावर असणाऱ्या घराचे दार बंद असताना घरफोडी करून भर दिवसा मोठी चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे शहरातील वाढत्या चोरांच्या प्रकाराने राळेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यश्रेणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मागील पंधरा दिवस आधी गणेश नगर मधील बाबाराव भोरे यांचे एकाच दिवशी दोनदा घरफोडले त्यांच्या घरामागे असलेले जिप शिक्षक चिरडे यांचे घरी कोणीचनसल्याचे पाहून त्यांचेही घराचे दाराचे कुलूप फोडून चोरी केली त्याच दिवशी न्यु माता नगर मधील लाडवण यांचे ही घरफोडले मागील शुक्रवारी बाजारातून चार ते पाच मोबाईल चोरी गेले एक मोबाईल घरून चोरी गेल्याचे सांगण्यात आले लाईट काढून नेणे छोट्या मोठ्या चोऱ्या दररोजच्या सुरू च असतात बुधवारला .
राधानगरी मधील चंद्रभान किनाके आपल्या कुटूंबा सह आजणसरा येथे भाऊ की तील स्वयंपाक असल्याने जेवण करायला गेले जेवण मुलगा आणी चंद्रभान क नाके आपल्या नितेश या मुलाच्या गॅरेजवर गेले सात वाजता घरी गेले पुढील लोखंडी दाराचे कुलुप काढले घराचे मुख्य दाराचे कुलूप काढायला गेले असता कुलुप तुटून होते घरात पाहीले तर क पाट फोडून त्यातील मुद्देमाल लंपास झाला होता नितेश किनाके याने राळेगांव पोलीसात तक्रार दिली पोलीस ताफा ठाणेदार चौबे यांच्या नेतृत्वात घटना स्थळी आले.
पाहणी केली श्वान पथकाला पाचारण केले परंतु सुगावा लागला नाही . हि चोरी भर दुपारी झाल्याने शहरातील नागरीक सुरक्षीत आहे का असाही प्रश्न उपस्थीत होतो . चंद्रभान किनाके हे सेवानिवृत्त पोलीस आहे या वर्षी मुलांच लग्न कराव या हेतूने त्यानी गोफ अंगठी होणा-या सुनमुली साठी कानतले करुन ठेवल्याचे त्यांनी सांगीतले . शहरात गणेश नगर राधानगरी चोरांसाठी राखीव कुरण असल्या सारखे झाले आहे. पोलीस गस्त बंद झाल्या सारखीच आहे . शहर बिट ज्याच्या कडे आहे ते करतात तरी काय हे समजत नाही वाहतूक व्यवस्थेपासून सर्वच कोलमंडल आहे .
रावेरी पॉईट ते शिवरकर यांचा पेट्रोल पंप म्हणजे मद्यपीचां हब झालेला आहे दारुच्या बॉटल घेणे खुल्या प्लॉट वर बसने लागलेल्या टपऱ्यावर बसून दारू पिणे हाप्रकार सर्रास सुरु आहे.शहरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे याची माहिती राळेगांव शहर सांभाळणा-या जमादार पोलीसांना माहीती आहे . मघपी दारुपीतात शहरात फिरतात . वाढत्या चो-याच्या प्रमाणाने शहरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे यावर राळेगांव पोलीसांनी मंथन करणे गरजेचे आहे असे शहरातील नागरीकांचे मत आहे .