Breaking News

चहांद येथे शॉट सर्किटने आग लागून तूर व कापूस जळून शेतकऱ्याचे झाले नुकसान

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे (राळेगाव)

राळेगाव/चहांद:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे कापूस व दोन पोते तुरी जळून नुकसान झाल्याचे शेतकरी यांनी सांगितले.

सविस्तर असे की दिनांक 24/2/2023 रोजी चहांद येथील शेतकरी रमेशराव जवादे यांच्या घरी पन्नास क्किंटल कापसाची गंजी लावलेली होती व दहा पोते तुरी होत्या अचानक शॉट सर्किट झाल्याने दहा क्किंटल कापूस व दोन पोते तुरी जळून खाक झाल्या.

या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटना स्थळाकडे धाव घेत गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून कापूस व तूर जळल्याने मात्र शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी या घटनेचा तपास करून शासनाने शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी अशी गावाकऱ्यांकडून मागणी होत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर मतदारसंघात 19 हजार मतांचे मॉक पोल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृध्द मतदारांना आनंद

चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : ऊन, वारा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved