
शिवचरित्र कीर्तनातून गौरीताई सांगळे यांचा सामाजिक संदेश
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने संपन्न झालेल्या किर्तन व संगीतमय कथेतून कथाकारांनी राळेगाव जनतेला सामाजिक संदेश दिला पहिल्या दिवशी शिवचरित्रकार गौरीताई सांगळे यांचे किर्तन झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना कीर्तनकार व श्रोते भावनिक झाले होते शिवचरित्र्याचा दाखला देत गौरीताई सांगळे यांनी समाजाला मार्गदर्शन करताना भावी पिढीने विशेषतः मुलींनी आई-वडिलांचा सन्मान करावा आई-वडिलांचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये असा संदेश दिला.
आपल्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कथा जिजाऊ ची वीर गाथा पोवाडा गाताना श्रोते मंत्रमुक्त झाले होते दुसऱ्या दिवशी सुशेन महाराज नाईकवाडे यांनी संगीतमय शिवचरित्र कथा सादर केली पुढील पिढीसाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याची जपणूक करावी असा संदेश त्यांनी दिला शिवचरित्र सांगताना अनेक वेळा त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा चित्र स्पर्धा वेशभूषा स्पर्धा किल्ले बनाव स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. यावेळी नगरपंचायत नवनियुक्त विषय सभापती जानराव गिरी.मंगेश राऊत. सिमरन पठाण कमलेश गयलोत कविता किनाके यांचा माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अशोक पिपंरे यांनी केले संचालन राजू रोहनकर , रंजन चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन शंकर मोहुर्ले यांनी केले.