
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
यवतमाळ :-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या तेजनी येथील शेतकरी राजू महादेव हिवरकर वय वर्ष ५० अंदाजे असून काल सकाळी आपली बैल जोडी घेऊन शेतात गेले असता घरी वापस न आल्याने घरच्या लोकांनी व गावातील नागरिकांनी राजू हिवरकर चा शोध घेतला पण तो कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मुलगा सचिन व गावातील काही लोक शेतात गेले असता शेतात असलेल्या गोठ्यात राजू महादेव हिवरकर हे दोरी द्वारे फासी असलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गावातील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली हि माहिती राळेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन प्रेताचा पंचनामा करून उत्तरिय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास राळेगाव पोलीस करित आहे म्रुतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असाआप्त परिवार आहे अशी माहिती म्रुतकाच्या परिवाराकडून प्राप्त झाली.