Breaking News

अंगणवाडी महिला कर्मचारी धडकल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

सात तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी समावेश-बेमुदत संप सुरूच राहणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी सोमवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी महिला कर्मचारी यांचा मोर्चा थेट चिमूर पंचायत समिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला या मोर्चा चे नेतृत्व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांनी केले,
कोरोना काळात कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेणाऱ्या अंगणवाडी महिला कर्मचारी महागाईने भरडल्या आहेत कर्मचारी यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागण्यांसाठी मोर्चा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा चे रूपांतर सभेत झाले.

अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी, माधुरी रमेश विर चिमुर प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड ललीता सोनुले संयोगीता गेडाम शोभा मेश्राम सिंदेवाही पुष्पा ठावरी वरोरा यांनी अंगणवाडी ताई विषयी मनोगत व्यक्त केले. एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम यांनी निवेदन स्विकारले. त्यानंतर नायब तहसीलदार तुळशीदास कोवे यांना अंगणवाडी शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनाची प्रत चिमूर एकात्मीक बाल विकास प्रकल्प मार्फत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास आयुक्त मुंबई, व तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवीन्यात आली.मोर्चात चिमूर नागभिड ब्रम्हपूरी भद्रावती वरोरा सिंदेवाही मुल या सात तालुक्यातील हजारो अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी सहभाग दर्शवीला होता.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अंतरवाली येथील फरार छत्रपती विघ्ने भामटा बिग बुल याचे कार्यालय गुंतवणूकदारांनी फोडले

टेम्पो भरून सामान घेऊन गेले फरार विघ्ने सोशल मीडियावर ऑनलाईन मग पोलिसांना का सापडत नाही??? …

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी – 100 टक्के वाटप करण्याच्या सुचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved