
प्रतिनिधी -कैलास राखडे
नागभिड= शिवसेना प्रणित युवासेनेचे चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी नुकतीच जाहीर केली,
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुचणेनुसार, युवासेना राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आदेशाने, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांचे परवानगीने राज्य कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे,
विदर्भ सचिव निलेश बेलखेडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी यांनी चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुखपदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची तसेच युवासेना नागभिड तालुका प्रमुख अमोल श्रावण मांढरे व युवासेना शहर प्रमुख पदी सुनील नारायण बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.