
नागरिकांत कार्यवाही विरोधात संताप
प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांचा विरोधात जागतीक महिला दिनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. अविश्वास प्रस्तावाचा बाजूने गजानन रामेकर, सतीश खोब्रागडे, छाया खिल्लारे, रश्मी पाटिल, शकुंतला अभ्यंकर, उज्वला गजभिये, शितल वानखेडे, साधना शेंद्रे, अर्चना चौधरी एकुण 9 सदस्यांनी मतदान केले. तसेच प्रस्तावाचा विरोधात रीता उमरेडकर, प्रशांत केवटे, रक्षा सुखदेव एकुण 3 सदस्यांनी मतदान केले.
नागपूर ग्रामीण चे तहसीलदार आशीष वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच व उपसरपंच विरोधात अविश्वास प्रस्तावाची निवडणूक घेण्यात आली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागतीक महिला दिनी लोकप्रिय महिला सरपंच वर खोटे व तथ्य हिन आरोप करून जो अविश्वास प्रस्ताव घेण्यात आला त्याचा जनते तर्फे आम्ही विरोध करतों.
तसेच सरपंच व उपसरपंच विरोधात बंड करणाऱ्या साधना शेंद्रे आणि अर्चना चौधरी ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून आणले होते ते फक्त भाजप विरोधी मतानी निवडून आले होते आणि आज त्यांनी जनतेचा विश्वास घात केल्याने आम्ही दवलामेटी तील महीला शक्ती तर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असे असे परिसरातील महिला व सामाजिक कार्यकर्त्या प्रिती वाकडे, जोत्सना बेले यांनी पत्रकारांना सांगितले.
दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये एकुण 17 सदस्या पैकी 7 सदस्य वंचित बहुजन आघाडी, तीन सदस्य काँगेस, 5 सदस्य भाजप व 2 सदस्य अपक्ष असे निवडून आले होते त्या पैकी काँगेस 3 व वंचित 6 यांनी युती करून सरकार स्थापना केली होती. विरोधी पक्षाने 5 सदस्या वर अतिक्रमणाची कार्यवाही करून पदावरून अपात्र केलें पुढे त्यांची हायकोर्टात, आयुक्तालयात केस प्रलंबित आहे तसेच विरोधी पक्षाचे 7 सदस्या वर सुद्धा अतिक्रमणं व घर टॅक्स वेळेवर न भरल्या ची सदस्या वर अपर जिल्हा अधिकारी कार्यालय केस प्रलंबित आहे. अश्यात मध्यंतरी अविश्वास प्रस्ताव नियोजित करण्यावरून सुद्धा प्रशासना विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे.