
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
शंकरपूर:-जागतिक महिला दिना निमित्याने चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर येथील ग्रामपंचायत भवन येथे महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शंकरपूर येथे ज्या महिलांनी स्वतःला सावरून स्वतःचा संसार सुरळीत केला व आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन घडवलं उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा केली तसेच कष्टकरी महिलांचा सत्कार साडी चोडी शाल व श्रीफळ देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी या महिला मेळाव्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतीश वारजुकर माजी उपसभापती रोशन ढोक,चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कसर,तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष सविता चौधरी,अनिता वारजुकर, माजी अध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमिटी लता अगडे,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, माजी पंचायत समिती सभापती शोभा पिसे, माधुरी रेवतकर,भावना पिसे, ढाकूनकर , डॉ.मोसीमा शेख , कमल राऊत, नीता बावनकर, सुषमा राहूड राऊत पोलीस पाटील जवराबोडी,व गावातील समस्त महिला मंडळी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संचालन मोहीनी गौरकर व आभार प्रदर्शन जोत्सना गोहने यांनी केले.