
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दि. 14 मार्च 2023 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी व मा.राहुलजी गांधी यांचे उच्च नुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. इमरान प्रतापगठी चेअरमन , अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग, मा.नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष, बालुभाऊ धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी आर्णी श्रेत्र डॉ.वजाहत मिर्जा, आमदार ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग, डॉ.अविनाशभाऊ वारजुकर माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.सतिश वारजुकर माजी अध्यक्ष गटनेते जि. प.चंद्रपूर तथा 74 चिमूर विधानसभा समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली ,तालुका काँग्रेस कमिटी ,शहर काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार व सोनियाजींच्या दृष्टीकोणातुन समाजाच्या सर्व स्तरावरील व विशेष तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेस पक्ष.पोहचणे आवश्यक आहे व तसेच विचार घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग तसेच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे काम सुरू आहे. म्हणून चिमुर तालुका काँग्रेस अल्पसंख्यक विभाग अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आरिफ इस्माईल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र डॉ. आविनाशभाऊ वारजुकर यांच्या वाढदिसाच्या अवचित्त साधुन डॉ. अविनाशभाऊ वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल महासचिव राम राऊत सर, तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, माजी तालुका.अध्यक्ष माधवबापू बिरजे तालुका पर्यावरण विभागाचे अध्यक्ष , प्रदीप तळवेकर, तालुका काँग्रेस ओबीसी अध्यक्ष विलास डांगे, तालुका सेवादल अध्यक्ष किशोर बापु शिंगरे, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, मिडिया प्रमुख पप्पु भाई शेख, तालुका सचिव विजय डाबरे, उपाध्यक्ष राजु चौधरी,डॉ.रहेमान पठाण, ओम खैरे, विलास पिसे,माजी नगरसेवक अ.कदिर चाचा , अरुण दुधणकर , नितिन कटारे, तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते इकबाल सौदागर, आदिल शेख, जावेद पठाण, जाबिर कुरैशी, दीपक कुंभारे,घनश्याम रामटेके, शहनाज अंसारी, रीता आंबादे, युवक काँग्रेसचे रोशन ढोक, नागेंद्र चट्टे, प्रशांत डवले,अक्षय लांजेवार, अक्षय नागरीकर, राकेश साटोने, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.