
लोखंडी पंजीचा दाता ठरला कर्दनकाळ – वर्धा बायपासवरील घटना
तालुका प्रतिनिधी -शशिम कामंळे
यवतमाळ:-मृत्यू कोणत्या रूपात समोर येईल याची शाश्वती नाही. एका विचित्र अपघातात असाच दबा धरून बसलेला काळ नांगरावर असलेला पंजीचा दाता पडल्याचे निमित्त होऊन समोर आला आणि यात निधा येथील करण पंडित मेश्राम वय १९ व मंगल महादेव जुमनाके वय २४ या दोन तरुण जीवाचा अंत झाला तर विवेक रामदास साळवे हा गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे की दिं १३ मार्च २०२३ रोज सोमवारला निधा येथील करण पंडित मेश्राम, मंगल महादेव जुमनाके व विवेक रामदास साळवे हे तिघेही ट्रॅक्टर क्रमांक एम एच २९ बी वि ११३४ या ट्रॅक्टर ने राळेगाव येथे नांगरावर पंजीचा दाता दुरुस्ती घेवून येत असताना वर्धा- बायपासवर ट्रॅक्टरला लावुन असलेल्या नांगरावर पंजीचा दाता आणला होता.
तो दाता पडल्याने ट्रॅक्टर थांबून हे तिघेही ट्रॅक्टर खाली उतरून दोघे पंजीचा दाता उचलत असताना राळेगाव कडून एम एच क्रमांक 32 क्यू 59 32 या भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरसह करण पंडित मेश्राम व मंगल महादेव जुमनाके या दोघांना जबर धडक देऊन हे दोघे जागीच ठार झाले तर विवेक रामदास साळवे यांच्या दोन्ही पायाला दुखापत लागून गंभीर जखमी झाला आहे. याबघटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवून ट्रक व ट्रक चालक भगवान हरिश्चंद्र सोनोने याला ताब्यात घेतले असून त्याच्यांवर २७९, ३०४ (अ) ३३७ ३३८ भादवीनुसार गुन्हा दाखल केला असून हे दोन्ही तरुण युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने निधा गावात शोककळा पसरली असून पुढील तपास ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात निलेश गायकवाड करीत आहे.