
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रॅक्टिस करून मारेगावला परतत असतांना चार युवकांनी चाकू , बंदूक दाखवित तब्बल पावणे चार लाखाने लुटल्याची खळबळजनक घटना दि.१३ ला रात्री घडली.डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा असे पिडीत डॉक्टरचे नाव आहे.
डॉ.हाजरा यांचे मारेगाव स्थित मंगलम पार्क येथें निवासस्थान असून तालुक्यातील नवरगाव येथे दवाखाना आहे.सोमवारला सायंकाळी मारेगाव येथे परतत असताना त्यांची स्कुटी स्विफ्ट कार ने आलेल्या चौघांनी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप समोर अडवीत कार मध्ये बसविले.चाकू आणि रिव्हॉल्व्हर दाखवित त्यांचेकडून नगदी 24000 , 15 हजार रु.ची सोन्याची अंगठी , 30 हजार रुपयांची सोन्याची चैन , मोबाईल ताब्यात घेत या युवकांनी तब्बल पंचेविस लाखाची मागणी करीत अपहरण करून हत्या करण्याची धमकी दिली.
अर्धा तास चाललेल्या या थरारीत कमालीच्या दहशतीत आलेल्या डॉ.हाजरा यांनी भितीपोटी 3 लाख रुपये देण्याचे कबुल करीत तशी व्यवस्था वणी येथील मित्राकडून करीत कार सरळ डॉक्टर ला वणी ला निघाली.वणी येथे कार मधील एका युवकाने कार चा अर्धा काच उघडत मित्राकडून बोलाविलेले रोख तीन लाख रुपये ताब्यात घेत मारेगाव दिशेने कूच केले.काही अंतरावर डॉ.हाजरा यांना सोडून कारसह युवकांनी पोबारा केला.
दरम्यान , 3 लाख 24 हजार नगदी व इतर सोने व मोबाईल असा किमान 3 लाख 69 हजार रुपयांची लूटमार केल्याने मारेगाव तालुक्यात पुरती दहशतीसह खळबळ उडाली आहे.परिणामी , दोन तासाच्या सिनेस्टाईल लुटमारीची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमा विरोधात बळजबरीने अपहरण करून गंभीर दुखापत करणे , शस्र बाळगून जीवे मारण्याची धमकी देत लूटमार करणे या आशयाच्या कलम 392 , 363 , 364 (अ) , 3/25 , 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रिव्हॉल्व्हर , चाकू दाखवित दरोडा टाकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.