
टायगर ग्रुप चिमूर च्या माध्यमातून राबविला उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात टायगर ग्रुप चिमूर च्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात टायगर ग्रुपची सदस्या किरण मोहिनकर ची आई स्व.इंदिराबाई मोहिनकर यांचे वर्ष श्राद्ध निमित्ताने सर्व टायगर ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिमूर येथील नेहरू जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना बुक, पेन,खाऊ वाटप केले.
यावेळी स्व.इंदिराबाई मोहिनकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, नेहरू जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ढाकोणकर यांनी आई माझा गुरु हि प्रार्थना करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले, मुलांनसाठी आईचे महत्त्व किती मोलाचे आहे याची जाणीव (मुलांना) विद्यार्थ्यांना करून दिली.
यावेळी शिक्षक एच के डायगहाने, शिक्षक जे के बोरकर, शिक्षक एस पी उपरे, शिक्षक डी एस नन्नावरे,शिक्षीका श्रीमती शोभाताई बोरकर व टायगर ग्रुपचे रोहन नन्नावरे ,किरण मोहिनकर, क्रिस , अनिल सहारे,शार्दुल पचारे , शुभम पसारकर, विकास जांभुळे, पवन झाडे , राहुल नामे, पवन डोंगरावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.